Breaking News

निर्मल भारत अभियानाची जनजागृती करावी -खा. चंद्रकांत खैरे


औरंगाबाद, जिल्हयात गˆामीण भागात लोकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी निर्मल भारत अभियान मागील काही वर्षापासून राबविण्यात येत आहे, परंतु यासंबंधी गˆामीण जनता अनभिज्ञ असल्याने जिल्हा परिषदेने मोठया प्रमाणात जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन जनसामान्यांना या योजनेची माहिती द्यावी असे आवाहन खा. चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत खा. चंद्रकांत खैरे अध्यक्ष पदावरुन बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी विपिन इटनकर जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश बैदमुथा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात गˆामीण विकासासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांसाठी केंद्र शासनाचा आर्थिक हिस्यात 38 टक्के निधी होता आता मात्र तो 50 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे गˆामीणस्तरावर योजनांना गती मिळणार आहे. यामध्ये राज्यशासनाचा 50 टक्के निधी पूर्वीपासून आहे तो तसाच ठेवण्यात आला आहे, असे सांगून खा. चंद्रकांत खैरे यांनी गˆामस्तरावरील विविध योजनांचा आर्थिक व भौतिक आढावा घेतला.  महसूल विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष अर्थ सहाय्य योजनेतील संजय गांधी इंदिरा गांधी अनुदान योजनेच्या तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून त्या लवकरच जाहिर केल्या जातील त्यामुळे या योजनेचे काम गतीने होण्यास मदत होईल असेही यावेळी खा. चंद्रकांत खैरे यांनी बैठकीत सांगितले. डी पी डी सी सभागृहात झालेल्या या बैठकीत समितीच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन विधायक सूचना केल्या. प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांनी आभार मानले.