Breaking News

वेमुलाच्या आत्महत्त्येच्या घटनेची चौकशी करण्याची सांगलीत मागणी

सांगली, 31 -  हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्त्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी आणि त्याच्या आत्महत्त्येला जबाबदार असणार्‍यांवर सक्त कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी निदर्शने केली. बहुजन समाज पार्टीच्यावतीने या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. गोरख कांबळे, शंकर माने, राहुल इमानदार, हर्षद कांबळे, मारुती कवठगी, हरिभाऊ सवने, संजय लोंढे, आण्णासाहेब सौदे, सागर कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. याच मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले. नितीन गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम तिरमारे, धनंजय खांडेकर, दीपक कांबळे, लीना यादव, सुरेश कांबळे, विठ्ठल सुकटे यांनी मागणीचे निवेदन दिले.