Breaking News

सहकारी संस्थांच्या रेशन दुकानांची आज झाडाझडती


बीड,दि.4 - जिल्ह्यात सेवा सहकारी सोसायट्या आणिसहकारी संस्थांमार्फत चालविल्या जाणार्‍या रेशन दुकानांचा आणि सहकारी संस्थांमार्फत कागदावर न आणणार्‍या संस्थांची झाडाझडती आज सोमवारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड हे घेणार असल्याची माहिती जनआंदोलन विश्‍वस्त अ‍ॅड.अजित एम.देशमुख यांनी दिली आहे.
जिल्हा सेवा सोसायट्या व अन्य सहकारी संस्थांमार्फत 247 रेशन दुकान चालविले जातात. यातील जवळपास 200 संस्थांनी या दुकानांचा व्यवहार कागदावर न घेता स्वतःच्या नावाने असल्याप्रमाणेच दुकाने चालविली. लेखापरिक्षणात ना व्यवहार दाखवला ना नफा तोटा ही शासनाची फसवणूक आहे. त्यामुळे सर्व संचालक, सचिव व लेखा परिक्षकांवर अफरातफरीचे गुन्हे दाखल करण्याची जनआंदोलनाची मागणी आहे.
सेवा सहकारी व अन्य संस्थांनी सर्व व्यवहार नियमाप्रमाणे करणे गरजेचे असेत. वार्षिक सर्वसाधरणत सीेत व लेखापरिक्षणात प्रत्येक रूपयाचा हिशोब संचालकांना दिला पाहिजे मात्र तो दिलाच नाही. आपली दुकाने स्वतःची संपत्ती आहे. अशी  वर्तवणूक केली. या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिल्याने शासनाच्या अन्य व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनाही कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी जिल्ह्यातील सर्व उप सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची बँक सोमवारी बोलावली आहे. या बैठकीस जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग 1 सहकारी संस्था बीड सर्वांना आवश्यक व परिपूर्ण माहिती सह हजर राण्याचे आदेशही दिले आहेत.