Breaking News

म्हाळसजवळा रोहयो भ्रष्टाराच प्रकरणी रगरागिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयात


बीड,दि.4 - तालुक्यातील म्हाळसजवळा येथे रोहयो व नरेगाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असताना आणि याबाबत प्रशासनाने जवाब घेतलेले असतानाही कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याने म्हाळसजवळा येथील रणरागिंणीनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन 2 जानेवार रोजी आपण कामावर नसल्याबाबत तक्रारी दाखल केल्या.
म्हाळस जवळा येथे नाला सरळीकर, बांध बंदिस्ती, विहिरी, वृक्ष संवर्धन तसेच एकाच गावात 32 रस्ते दाखवून मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला. वृत्तपत्रातून हा अपहार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासनाने चौकशीचा फार्स केला मात्र जवाब घेऊनही संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, पोस्टमन, रोहयोतील भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही. ही कारवाई झाली नाही तर या गावातील नारायण राऊत यांनी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.