Breaking News

भेंड टाकळी तांडाच्या जळीतग्रस्तांना शासनाने प्रत्येकी 1 लाखाची मदत द्यावी-प्रा चव्हाण


गेवराई,दि.4 - गेवराई तालुक्यातील सिरसदेवी जिल्हा परिषद गटातील भेंडटाकळी तांड्यावर दि. 1 रोजी भरदुपारी सहा घरांना अचानक आग लागून सर्व संसार उपयोगी सामान जळून खाक झाल्याची दुदैंवी घटना घडली. सदरील आगीत भस्मात झालेल्या घरांचा त्वरीत पंचनामा करून जळीतग्रस्त बंजारा समाज बांधवांना शासनाने किमान प्रत्येकी एक लाख रूपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी बंजारा समाज परिवर्तन अभियानाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांनी जिल्हाधिकारी बीड व तहसिलदार गेवराई यांच्याकडे एका पऋकाद्वारे केली.
प्रा.पी.टी. चव्हाण यांनी तातडीने भेंडटाकळी तांडा येथभल जळीतग्रस्त कुटूंबाची प्रत्यक्ष भेट देउन चर्चा केली व त्यांना धीर देउन शासनाकडुन भरीव आर्थीक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. जर शासनाने याबाबीची गांभीर्याने दखल न घेतल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असे सांगितले. सदरील आग विझविण्यासाठी परिसरातील अनेक नागरीक धावून आले त्यामध्ये प्रामुख्याने पत्रकार विनायक उबाळे, काशिनाथ नाईक, मानसिंग राठोड, सचिन जाधव, आदींनी अथक परिश्रम घेतले. पत्रकात प्रा.पी.टी. चव्हाण यांनी म्हटले आहे की, नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भेंड टाकळी तांड्यावरील एक दोन नव्हे तर सहा घरे आगीत जळून भस्मसात होतात अन दुर्दैवाने आग विझविण्यासाठी पुरेसे पाणी देखील तांड्यावर व परिसरात उपलब्ध नाही. एकीकडे शासन व प्रशासन स्वातंत्र्याच्या 68 वर्षापर्यंतही बंजारा समाजाच्या तांड्याना रस्ते, शाळा, पाणी, आरोग्य आदी मुलभूत सुविधा देत नाही अन निसर्गही अशा घटनेतून बंजारा समाजची क्रुर थट्टा करतो आहे. यापेक्षा भिषण वास्तव या बंजारा समाजाचे काय असून शकते असा प्रश्‍न पडतो. भेंडटाकळी तांडा येथील रहिवाशी व वयोवृद्ध शेतकरी सिताराम चव्हाण यांच्या सहाही मुलांची घरे शेजारी शेजारी असल्यामुळे या आगीत विश्‍वनाथ सिताराम चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, अशोक सिताराम चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, विलास चव्हाण, ज्ञानदेव चव्हाण यांची घरे आगीत जळून भस्मासात झाली आहेत. तांड्यावर लागलेल्या भिषण आगीत वरील सर्वांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे लत्ते, आयुष्यभर उसतोडणी कयन अन राबराब राबून कमविलेलया दागदागिणे, पैसे बैलगाडी, पिठाची चक्की, धान्यासह कागदपत्रे व लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे सर्व कुटूंबे उघड्यावर पडले असून 
त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. म्हणुन प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. कायदा नियम व निकषाचे कारण पुढे करता मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक जळीत ग्रस्तांना किमान एक लाख रूपयांची मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने सदरील जळीतग्रस्त प्रकरणात मदत देण्यास टाळाटाळ केल्यास बंजारा समाज परिवर्तन अभियानच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे. या पत्रकावर रमेश पवार, सर्जेराव जाधव, शरद चव्हाण, गोरख राठोड, काशिनाथ राठोड, संदिप राठोड, बाळु चव्हाण, रविंद्र राठोड, रतन पवार देविदास चव्हा आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.