पठाणकोट हल्ल्यात आपलाच ’फितूर’ लाइट्सची दिशा बदलणारा तंत्रज्ञ ताब्यात
नवी दिल्ली, 8 - पठाणकोट हल्ल्यात दहशतवादी एअरबेसमध्ये घुसण्याच्या प्रकरणी एअरफोर्स स्टेशनचा एका कर्मचार्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी दोन कर्मचार्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला कर्मचारी मिलिटरी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्विसेजचा कर्मचारी आहे. हा कर्मचारी सध्या एअरबेसमध्ये तैनात होता. याच कर्मचार्याने दहशतवाद्यांना एअरबेसमध्ये घुसण्यास मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या भिंतीवरुन दहशतवादी एअरबेसमध्ये घुसले. तेथील प्लड लाईट्स त्यावेळेस काम करत नव्हते. ज्या जागी दहशतवादी आत घुसले ती जागा मिलिटरी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्विसेजच्या मेटेनेन्स शेड जवळची होती. ताब्यात घेण्यात आलेला कर्मचारी हा काही दिवसांपूर्वीच उधमपूरहून पठाणकोटला बदली होऊन आला होता. हा कर्मचारी चतुर्थ श्रेणीतील असल्याचे सांगितले जात आहे.