Breaking News

संत गाडगेबाबा अंधश्रध्दा निर्मुलन व स्वच्छता अभियानाचे महान दुत - डॉ. इंगोले


परभणी, 12  - समाजात, अंधश्रध्दा, अज्ञान व कर्जबाजारीपणामुळे व्यसनाधिनता वाढीस लागलेली होती. जत्रा व सण आला की लोक कर्ज काढुन कोंबडे बकर्‍यांच्या बळि देत असत. अशा परिस्थीतीमध्ये संत गाडगेबाबांनी अशा अनिष्ट प्रथेविरुध्द आपल्या किर्तनातुन प्रहार केला. तसेच खर्‍या अर्थाने ते अंधश्रध्दा निर्मुलन व स्वच्छता अभियानाचे महान दुत होते असे प्रतिपादन डॉ. अगस्ती इंगोेले यांनी केले. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड व युगांधर फाऊंडेशन परभणीच्या वतीने आयोजीत बहिःशाल शिक्षणकेंद्र व्याख्यानमालेत “संत गाडगेबाबा यांचे अंधश्रध्दा निर्मुलन विषयक कार्य ’’ या विषयावर बोलत होते. वृंदावन कॉलनी परभणी येथे दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. पार पडलेल्या व्याख्यानमाले प्रसंगी जि.प.चे बाबुराव केळकर, वसीम कबाडी, नामदेव लहाडे, संजीव आढागळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनिष जहागीरदार यांनी तर आभार विजय पानबुडे यांनी केेले. तसेच यावेळी पुरूष व महिलांची उपस्थिती होती.