गंगाखेडात वीज वितरणची धडक मीटर तपासणी सुरू; वरिष्ठांचा सहभाग
गंगाखेड, दि.12 - वीज मीटर तपासणीच्या नावाखाली वीज चोरी करणार्या ग्राहकांसोबत आर्थिक तडजोड
करुन लाखो रुपयांची माया जमविणार्या शहर अभियंताचे वृत्त ‘दै. लोकमंथन’ मध्ये प्रकाशीत होताच अधिक्षक अभियंता यांच्या आदेशावरुन उपअभियंता यांनी शहरातील मीटर तपासणीच्या मोहीम सर्व सुत्र हातामध्ये घेवुन नवीन टिमचा माध्यमातुन मीटर तपासणी ची धडक मोहिम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी वीज चोरीचा प्रकार उघड झाला आहे.
वीज वितरणचे शहर अभियंता यांनी डिसेंबर 2016 मध्ये शहरातील अनेक भागातील वीज मीटरची
तपासणी केली. यामध्ये बहुतांशी मीटरमध्ये हेराफेरी करुन वीज चोरी चे प्रकार समोर आले पण आर्थिक
तडजोडीचा माध्यमातुन वीज चोरी ग्राहकांकडुन लाखो रुपयांची माया जमविण्यात आली. या प्रकाराबाबत एका महावितरण चा नाराज कर्मचार्याने हा सर्व प्रकार उघड केला या प्रकरणास ‘दै. लोकमंथन’ ने प्रकाश टाकताच महावितरण खडबडुन जागे झाले. या वृत्ताची दखल घेवुन संबंधीत शहर अभियंतावर कार्यवाही करणार असल्याचे कळते आहे. शहरात वीज चोरीचा प्रकाराबाबत कडक मोहिम पुन्हा आज पासुन उपअभियंता यांचासुत्राखाली महावितरणने सुरू केली असुन शहरातील सर्व भागातील वीज मिटर तपासणी ची धडक मोहिम सुरू केली आहे. या तपासणीमध्ये पहिल्याच दिवशी अनेक मीटर मधुन वीच चोरीचा प्रकार उघड झाला आहे. महावितरणने या मोहिमेत वीज कर्मचारी, आजी,माजी यांच्या मीटरची तपासणी करावी अशी मागणी होत आहे. मीटरमध्ये फेरबदल करुन देणारे वीज कर्मचारी यांनी नेमलेल्या खास व्यक्तीकडुन केली जात आहे. डिसेंबर मध्ये शहर अभियंता यांनी तपासणी केलेल्या व बदलण्यात आलेल्या वीज मीटरबाबत सखोल चौकशी ची मागणी सर्वत्र होत आहे.