Breaking News

गौतम नगर येथे पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ


परभणी, 12 - शहरातील प्रभाग क्रं. 22 मधील गौतम नगर येथे दि. 11 जानेवारी रोजी नगरातील अंतर्गत 
पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ महानगर पालिकेच्या महापौर संगिता वडकर यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी मनपाचे उपमहापौर भगवानराव वाघमारे, राजाभाऊ वडकर, समाज कल्याण सभापती आकाश 
लहाने,विधी व न्याय सभापती सुनिल देशमुख, अक्षय देशमुख, बंटी जावळे, सय्यद इस्माईल, अनंत देशमुख 
गौतम नगरातील व महिला, पुरूष उपस्थित होते. यावेळी महापौर, उपमहापौर, सभापती व सर्व मान्यवरांचा 
शाल व श्रीफळ देवुन समाज कल्याण सभापती आकाश लहाने यांनी सत्कार केला.