नाबार्ड दिनदर्शिकेचे प्रकाशन
बुलडाणा 20 - राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या दिनदर्शिकेचे व 2016-17 आर्थिक वर्षाचे कृषि कर्ज आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हा नियोजन भवनात प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक पी. एम शेंडे, जिल्हा उप निबंधक निळकंठ करे,
जिल्हा बँकेचे मुख्या कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक समन्वयक राजेश परब, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक धनंजय मोरघडे उपस्थित होते. नाबार्डच्या दिनदर्शिकेत नाबार्डच्या कृषि विषयक कर्ज योजना, दिर्घ व मध्यम मुदतीच्या कर्ज योजनांची माहिती विस्तृतपणे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 2016-17 च्या कृषि पत पुरवठा आराखडा पुस्तिकेमध्ये 2016- 17 च्या कृषि पिक कर्ज, दिर्घ मुदती शेती व पुरक व्यवसाय कर्ज, शेती विषयक वार्षिक वित्त पुरवठा यांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.