‘शिवसंग्रामचा’ समाजकल्याण प्रशासनाला ‘अल्टीमेटम’
बुलडाणा (प्रतिनिधी) । 20 - जिल्हा समाज कल्याण विभाग अंतर्गत चालविल्या जाणार्या शासकिय मुला-मुलींच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन, सुविधेचा अभाव व अन्य हेळसाड होत असल्याच्या कारणावरुन शेकडो विद्यार्थी व शिव-संग्राम पदाधिकार्यांनी तिव्र आंदोलन केले होते.
याची दखल घेव्ाुन आज अतिरिक्त जिल्हाधिकारी टाकसाळे यांच्या दालनात बैठक घेण्यात येव्ाुन प्रशासनाला 31 जानेवारी पर्यंत ‘अल्टीमेटम’ देण्यात आला असुन त्यानंतर स्वत: अतिरिक्त जिल्हाधिकारी टाकासाळे व शिव-संग्रामचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप गायकवाड याचे पदाधिकार्यांसह वसतीगृहाची पाहणी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहाला विविध समस्यांनी ग्रासुन सोडले आहे. या वसतीगृहात अद्यावत ग्रंथालय, इंटरनेटची सुविधा, संगणक कक्ष व अभ्यासिका सुध्दा नाही. त्यामुळे या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना खोलीमध्ये बसुनच अभ्यास करावा लागत आहे. तसेच या वसतगृहातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रिडा साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले नाही. मुलींंच्या वसतीगृहाची तर भयावह अवस्था आहे. वसतीगृहात निकृष्ठदर्जाचे भोजन मिळत असल्यामुळे येथील विद्यार्थीनींनी मागील दोन दिवसापासुन जेवणावर बहिष्कार टाकला होता.
तसेच या वसतीगृहात पलंग नसल्यामुळे मुलींंना जमीनीवर गाद्या टाकुन झोपावे लागत आहे. मुलांच्या वसतीगृहातील कार टि.व्ही. मागील काही वर्षापासुन बंद आहे. सोलर सिस्टीम देखील बंद पडली आहे. बाथरुमची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर आंघोळ करावी लागत आहे. त्यामुळे वसतीगृहात राहणार्या मुला-मुलींंची हेळसांड थांबविण्यासाठी या दोन्ही वसतीगृहात सुविधा उपलब्ध करुन देण्याता याव्यात या मागणीसाठी 11 जानेवारी रोजी सामाजिक न्यायभवनाच्या प्रवेशद्वारावरच शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवत अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांचेशी चर्चा करुन निवेदन दिले होते. यावर आज 18 जानेवारी रोजी शिवसंग्राम संघटनेच्या या आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाज कल्याण अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातीतल वसतीगृहातील गृहपालांची बैठक सकाळी 11 वाजता घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी समाजकल्याण अधिकारी वाघ यांच्या उपस्थितीत गृहपाल व कर्मचार्यांना 31 जानेवारी पर्यंत होइल तेवढ्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पुर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसेच 31 जानेवारीपर्यंत अहवाल सादर न केल्यास शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत जिल्ह्यातील सर्व वसतीगृहाची अप्पर जिल्हाधिकारी पाहणी करणार असल्याची माहिती देत कामात कुठलीही कमतरता व कुचराई भासल्यास तात्काळ संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही देण्यात आले. यावेळी शिव-संग्राम संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, सरचिटणीस देवानंद बिचारे श्रीकृष्ण शिंदे, अमोल पुरभे, श्रीकृष्ण जेऊघाले, संदिप सपकाळे, गणेश भोसले, देवीदास पर्हाड यासह शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.