Breaking News

रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध; आमदारकी संकटात

बुलडाणा, 20 -  मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र विभागीय पडताळणी समितीने मंगळवारी अवैध ठरविले. त्यामुळे रायमुलकर यांची आमदारकी कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते.
मेहकर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. रायमुलकर हे सुतार जातीचे असून ही जात इतर मागासप्रवर्गात मोडते. परंतु रायमुलकर यांनी बनावट दस्तऐवजाचा
आधार घेत सुतारऐवजी बलई अशी जात निवडणूक आयोगाला भासविण्याचा प्रयत्न केला. त्याच आधारावर त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव सरदार यांनी पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. परंतु समितीने त्यावर निर्णय दिला नाही. त्यामुळे सरदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मंगळवारी अकोला येथील समितीने हे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला.