अच्छे दिन या नावाखाली सरकारने दिशाभुल केली ः आ.बोंद्रे
चिखली (प्रतिनिधी) । 20 - युवक कॉगे्रसच्या माध्यमातुन काम करीत असतांना युवकांनी जनतेच्या कामांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली असून आता पासूनच सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेची काम कराल तरच उदयाचे मोठे नेते व्हाल. आजकाल सोशल मिडीयाचे फॅड सर्वत्र दिसत आहे, पण नेता जर व्हायचे असेल तर सर्वसामान्यांची कामे करावी लागतात, केवळ फोटो बाजी करून काही मिळत नसते तर जेव्हा आपण लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतो तेव्हा लोक आपोआपच अशा व्यक्तीमध्ये नेतृत्व शोधू लागतात. असे प्रतिपादन जिल्हा कॉगे्रसचे माजी अध्यक्ष व सनियंत्रण समिचे प्रदेश उपाध्यक्ष श्यामभाउ उमाळकर यांनी चिखली येथील युवक कॉगे्रसच्या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना केले. तालुक्यातील शिंदी हराळी फाटयावर शिंदी हराळी फाटयावर तालुका व शहर युवक कॉगे्रसच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 17 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटक आमदार राहूुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा युवक कॉगे्रस निरीक्षक सागर देशमुख, जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, जिल्हा महासचिव राम डहाके, तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील, जेष्ठ संचालक सचिन शिंगणे, माजी उपसभापती नंदुभाउ सवडतकर, नगरसेवक कुणाल बोंद्रे, माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, सुनिलकुमार सरडकर, बिदुसिंग इंगळे, पंचायत समिती सदस्य दयानंद खरात, लक्ष्मण आंभोरे, किशोर साखरे, धाडचे सरपंच रिजवान सौदागर, किशोर कदम, शिवनारायण म्हस्के, सनियंत्रणचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे, आयोजक युवकॉ तालुका अध्यक्ष रमेश सुरडकर, शहर अध्यक्ष तुषार भावसार हे होते.
अच्चे दिन आनण्याचे स्वन्प दाखवून जनतेची दिशाभुल करून, निर्माण झालेल्या परिस्थीतीचा फायदा उचलत सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणी राज्यातील भापजा सरकारने आवघ्या वर्षभरामध्ये देशातील जनतेचा भ्रमणनिराष केला आहे. अशा दिशाभुल करणार्या आणी संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी धावून न जावू शकणार्या सरकारच्या विरोधात युवक कॉगे्रसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने करावीत असे आवाहन अखिल भारतीय युवक कॉगे्रसचे सरचिटणीस हरीकृष्णजी यांनी चिखली येथील आयोजित युवक कॉगे्रसच्या मेळाव्यामध्ये केले. यावेळी पुढे बोलतांना हरीकृष्ण यांनी सर्वच आघाडयावर अपयशी ठरलेल्या या सरकारकडून जनतेची कोणतीही आशा-आपेक्षा होतांना दिसत नाही. शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय या सरकार कडून आजवर झालेला नाही, त्यामुळे या सरकारला खाली खेचण्यासाठी युवकांनी आता पुढाकार घेण्याची गरज आहे असे प्रतिपाद केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी अच्छे दिन या गोडस नावाखाली यश संपादन करून या सरकारने शेतकरी, सर्व सामान्य जनता आणी बेरोजगार युवक यांची केवळ दिशाभूल करून सत्ता हस्तगत केली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या समस्या या सरकारला कळल्याच नाही. उद्योगपती आणी उद्योग यांच्याच भोवती या केंद्र आणी राज्य सरकारची धोरणे केंद्रीत राहली असे आजवरच्या या सरकारच्या कारर्कीतीवरून दिसून येते. सर्व सामान्यांच्या समस्याची चाड नसलेल्या या सरकारला आता युवक कॉगे्रसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनगटातील आपली शक्ती दाखवून देण्याचे गरज आहे असे प्रतिपादन केले. तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी पक्षात काम करतांना युवक कॉगे्रसच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून पक्षात असलेल्या त्यागाच्या परंपरेचा सार्थ अभिमान बाळगावा. पक्षाच्या भरोवशावर वेगवेळया पदावर काम करणार्या पदाधिकार्यांनी कायम पक्षाचा सिम्बॉल आणी पक्षाची धैयधोरणे घेवूनच समाजात वावरले पाहीजे. जगात भारत हा देश बलशाली राष्ट्र म्हणून उभा करावयाचा असे तर या देशातील युवक हा या देशाचा राजक
ारणाचा व समाज कारणाचा कणा असला पाहीजे असे सांगितले. बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील यांनी पक्षात काम करतांना पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार संयमाने काम करीत राहिल्यास आज ना उदया नक्कीच चांगल्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्तावीक राम डाहके, सुत्र संचलन राहुल साळोख यांनी तर पुरूषोत्तम हाडे यांनी आभार मानले.
या कार्यमाला मतदार संघातील युवका कॉगे्रसचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी तालुका उपाध्यक्ष नंदु हाडे, पुरूषोत्तम हाडे, गजानन परीहार, राहुल सवडतकर, दिपक खरात, वचन वायकोस, सागर खालसे, विकी जमदार, गजानन घायाळ, पिंटु गायकवाड, सुनिल म्हस्के, संजय गिरी, निबांजी सवडे, प्रदिप मोरे, भारत मोरे, संजय सोळंकी, प्रकाश राठोड, राजु मोरे, बंडु आंभोरे, अनिल फेफाळे, कृष्णा मुरकूटे, यांनी परीश्रम घेतले.