Breaking News

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला


काबूल, 4 - अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ हल्ला झाला. यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचे समजते. मात्र या भागात आणखी दोन अतिरेकी असल्याची शक्यताही वर्तवण्यात येतीये. या हल्लेखोरांनी स्फोट करत दुतावासाच्या परिसरात गोळाबार केला.
अफगाणिस्तान स्पेशल फोर्सने या भागाचा ताबा घेताला. दरम्यान दूतावासातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे विदेश मंत्रालयाने सांगीतले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनें घेतलेली नाही.