Breaking News

ईशान्य भारतात भूकंपाचे तीव्र धक्के; 5 मृत्युमुखी, 50 जखमी


मणिपूर, 4 -भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आज पहाटे  ईशान्य भारत हादरला. मणिपूरमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपात मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.
भूकंपाचे केंद्र मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 33 किलोमीटरवर तेमलाँग येथे जमीनीखाली 10 किलोमीटर खोल असल्याचे सांगितले गेले. भूकंपात मोठ्याप्रमाणात वित्तहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मणिपूर, ओडिशा, मिझोराम, झारखंड, बिहार, अरुणाचल प्रदेश, पश्‍चिम बंगाल, भारत-म्यानमार सीमाभाग. बांगलादेश, नेपाळमध्येही धक्के जाणवले. सोमवारी पाहाटे 4 वाजून 35 मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्लीहून एनडीआरएफची टीम मणिपूरला पाठवली जाणार.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली. भूकंपामुळे मणिपूरमध्ये एकाचा मृत्यू. भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितले, गृहमंत्री राजनाथसिंह आसाममध्ये आहेत. त्यांच्यासोबत भूकंपानंतरच्या परिस्थितीवर चर्चा झाली. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. - राजनाथसिंह सिलिगुडीच्या राजभवनात होते. भूकंप आला तेव्हा माझी रुम देखील हलली होती. गेल्या महिन्यात बसले  होते धक्के.  बिहार आणि झारखंडच्या काही जिल्ह्यांमध्ये 15 डिसेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. भयभीत लोक  रस्त्यावर धावले होते. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल मोजली गेली होती. जवळपास पाच सेकंद धरणीचे कंपन होत
होते. वास्तविक या भूकंपाने फार नुकसान झाले नव्हते.