Breaking News

भारतीय तुरुंगांतून 189 पाक कैदी फरार - - पाकिस्तानी कैदी हरवल्याचा पाकचा दावा


 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 04 - भारतातील तुरुंगांमधून मच्छिमारांसह नागरिकांचाही समावेश असलेले 189 पाकिस्तानी कैदी हरवल्याचा दावा पाकिस्तानने केल्यामुळे आता या दोन्ही देशांतील चर्चेचा हा गंभीर मुद्दा बनला आहे. 31 मे 2008 रोजी भारत-पाकमध्ये एक करार झाला होता. या करारांतर्गत वर्षातून दोन वेळा भारताने पाकच्या तर पाकने भारताच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची माहिती देणे गरजेचे आहे. दोन्ही देश दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये ही माहिती परस्परांना पाठवितात. दरम्यान भारताने दिलेल्या माहितीबाबत पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे.
भारताच्या मते पाकिस्तानच्या 17 मच्छिमारांसह एकूण 271 कैदी भारताच्या तुरुंगांत आहेत. तर पाकिस्तानने दावा केला आहे की, 113 मच्छिमारांसह एकूण 460 कैदी भारताच्या ताब्यात आहेत. हा मुद्दा भारत-पाकिस्तानमध्ये 25 जानेवारी रोजी होणार्‍या विदेश सचिवांच्या बैठकीत हा उपस्थित करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मागील वर्षी उफामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यातील भेटीनंतर सांगण्यात आले होते की, दोन्ही देश त्यांच्या मच्छिमारांना नावांसहीत 15 दिवसांच्या आता सुटका करतील. त्या वेळीदेखील मच्छिमारांच्या सुटकेच्या संख्येवरून असहमती होती. दोन्ही देशांनी एक दुर्‍यांना अ‍ॅग्रिमेंट ऑन द प्रोहिबिशन ऑफ अटॅक अगेंस्ट न्यूक्लियर इस्टॉलेशननुसार न्यूक्लियर इंस्टॉलेशन्सची यादी देखील परस्परांना देण्यात आली होती. पाकिस्तान हा मुद्दा 25 जानेवारीला परराष्ट्र सचिव एस.
जयशंकर यांच्या इस्लामाबाद दौर्‍यादरम्यान उपस्थित करणार आहे.