Breaking News

सानिया- मार्टिनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली

सिडनी, 29 -  भारताच्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिरंगा फडकावला आहे. सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
सानिया आणि मार्टिना या अव्वल मानांकित जोडीने अँड्रिया लावाकोव्हा आणि ल्युसी रॅडेका या चेक प्रजासत्ताकच्या जोडीवर 7-6, 6-3 अशी मात केली. महिला दुहेरीत ‘सानटिना’चा हा सलग 36वा विजय ठरला. या विजयासह सानिया आणि मार्टिनाने सलग तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपदही आपल्या नावे केले आहे.