Breaking News

कचर्‍याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू

शिर्डी, 29 -  कचर्‍याच्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल नारकर असे या वृद्धाचे नाव असून ते मुळचे मुंबईचे रहिवासी असल्याचे कळते.
एक वयोवृद्ध रुग्ण पिंपळवाडी रोडवर दोन दिवसांपासून असल्याची माहिती आरोग्य विभागाला कळवली. यानंतर विठ्ठल नारकर यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नगरपंचायत अधिकार्‍यांनी चक्क कचर्‍याच्या गाडीचा वापर केला होता. खरंतर साईंच्या आशीर्वादाने नगरपंचायत अब्जाधीश झाली. भक्तांच्या कोट्यवधींच्या दानाने साई संस्थानाची भरभराट झाली. मोठमोठाली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरु झाली.  पण एका रुग्णाला उपचारासाठी नेताना प्रशासनाला एकही रुग्णवाहिका मिळू नये याबाबत अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्दयी कारभारावर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. शिर्डीत साईंच्या रुग्णसेवेला हरताळ फासण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.