Breaking News

सानिया- मार्टिनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली

सिडनी, 29 -  सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले. सानिया आणि मार्टिना या अव्वल मानांकित जोडीने अँड्रिया लावाकोव्हा आणि ल्युसी रॅडेका या चेक प्रजासत्ताकच्या जोडीवर 7-6, 6-3 अशी मात केली. महिला दुहेरीत ‘सानटिना’चा हा सलग 36वा विजय ठरला. या विजयासह सानिया आणि मार्टिनाने सलग तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपदही आपल्या नावे केले आहे.