Breaking News

प्रियांका झळकणार बेवॉचमध्ये?

मुंबई : दिग्दर्शक सेठ गॉर्डन या मालिकेवर आधारित चित्रपट तयार करत असून थोड्याच दिवसांत मबेवॉचफच्या चित्रीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. क्वांटिको या अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकेसाठी मानाचा पीपल्स चॉईस अ‍ॅवॉर्ड पुरस्कार पटकवल्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका 
मोठ्या हॉलीवूड प्रोजक्टमध्ये काम करण्याच्या तयारीत आहे. प्रियांका सध्या  ड्वेन जॉन्सन आणि झॅक इफ्रॉन यांच्याबरोबर ङ्गबेवॉचफ या चित्रपटात काम करण्यासंदर्भात बोलणी करत असल्याचे वृत्त आहे. नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली बेवॉच ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती.