Breaking News

लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब यांचं निधन


नवी दिल्ली, 14 - बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब यांचे काल नवी दिल्लीत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
1971 च्या ऐतिहासिक युद्धामध्ये बांगलादेशच्या ढाकामध्ये घुसलेल्या 81 हजार पाकिस्तानी सैनिकांना शरण येण्यास जेकब यांनी भाग पाडले होते. ज्यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला होता. 1923 साली बंगाल प्रांतामध्ये जन्मलेले जेकब हे 1971 च्या युद्धामध्ये भारताच्या ईस्टर्न कमांडचे मेजर जनरल होते. वयाच्या 19 व्या वर्षी लष्करात दाखल झालेल्या जेकब यांची कारकीर्द अत्यंत प्रभावशाली होती. 1978 साली लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जेकब यांनी गोवा आणि पंजाब या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.