Breaking News

अनकुटे सोसायटी अध्यक्षपदी बाजीराव पवार बिनविरोध


 येवला/प्रतिनिधी। 4 -  अनकुटे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजीराव पवार यांची तर उपाध्यक्षपदी अर्जुन गोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 
संस्थेची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच पार पडली असून महेंद्र पगारे, शिवाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी आर. एम. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेस सभेस संचालक भाऊसाहेब सोनवणे, प्रभाकर गायकवाड, पुंजाराम पगारे, मंगलबाई गायकवाड, जिजाबाई गायकवाड उपस्थित होते. तर विरोध जय महाराष्ट्र पॅनलचे संचालक या बैठकीकडे फिरकलेही नाही. विहित वेळेत अध्यक्षपदासाठी पवार व उपाध्यक्षपदासाठी गोरे यांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणुक निर्णय अधिकारी लोंढे यांनी बिनविरोध निवड घोषीत केली. निवडणुक कामात सचिव दाने, सह सचिव प्रभाकर जाधव यांनी सहाय्य केले. या निवडीचे गावातुन स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, या निवडी जाहिर होताच पदाधिकारी व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक गायकवाड, भिमराज गायकवाड, महेंद्र पगारे, शिवाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड, रावसाहेब सोनवणे, दशरथ पवार, एकनाथ पवार, सुभाष पवार, शांताराम पवार, भाऊसाहेब पवार, विलास पवार रतन पवार, भाऊसाहेब गोरे, आप्पा गोरे, गौतम पगारे, भाऊसाहेब गोरे, देविदास गायकवाड, साहेबराव सोनवणे, सोपान गायकवाड, मनोहर गायकवाड, विजय गायकवाड, गोरख गायकवाड, भाऊराव गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, दत्तु गायकवाड, भिका गायकवाड, अण्णा विंचू, भानुदास गायकवाड, सुदाम तळेकर, नवनाथ तळेकर, मोहनराव गायकवाड, नामदेव गायकवाड, रंगनाथ गायकवाड, शरद गायकवाड आदी उपस्थित होते.