Breaking News

स्फोटके निकामी करताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद -- दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 10 जवान शहीद, 11 जवान जखमी


 पठाणकोट/वृत्तसंस्था । 04 - येथील हवाई दलाच्या तळावर पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून एनएसजीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. येथे आणखी दोन दहशतवादी लपले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर रविवारी सकाळी शोधमोहिम सुरू असताना, पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला. शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी पेरलेल्या आईडी स्फोटकांचा स्फोट झाला. तसेच येथील हवाई दलाच्या तळावर स्फोटके निकामी करत असताना झालेल्या स्फोटामध्ये लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत. आतापर्यंत दहशतवादी हल्ल्यात एकूण 10 जवान शहीद झाले असून, 11 जवान जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.  काल दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना तीन जवांनांना वीरमरण आले. तर चार जवान गंभीर जखमी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्या चारही जखमी जवानांनी आपले प्राण सोडले. या हल्ल्यात जखमी झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमारही शहीद झाले. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डिफेन्स सर्व्हिस कोअरचे सहा, एअरफोर्स आणि ‘गरुड’चे प्रत्येकी दोन जवान शहीद झाले आहेत.  दरम्यान, पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर रविवारी सकाळी शोधमोहिम सुरू असताना, पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला. शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी पेरलेल्या आईडी स्फोटकांचा स्फोट झाला. यामध्ये एनएसजीचे तीन जवान जखमी झाले आहेत. प्रारंभी पठाणकोट तळावर पुन्हा गोळीबार, बॉम्बस्फोट झाल्याची माहिती होती. त्यामुळे सहावा दहशतवादी आतमध्ये असल्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) आठ सदस्यीय शोधपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. सुरक्षा दलाकडून सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून ते अद्याप संपलेले नाही. हवाई तळ उद्वस्त करण्याच्या उद्देशाने काल पहाटे साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हे सर्व जण पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा अंदाज लष्करी सूत्रांकडून वर्तविण्यात आला आहे.