Breaking News

भारत-पाक चर्चा काही दिवस लांबणीवर ?


नवी दिल्ली, 13 - भारत आणि पाकिस्तान दरम्यान 15 जानेवारी रोजी होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा काही दिवसांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. पाकिस्तानची चर्चा करायची की नाही याबाबत मोदी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे पठाणकोट हल्ल्याचा परिणाम थेट भारत-पाकिस्तान चर्चेवर होण्याची चिन्हे आहेत.
पाकिस्तानने एकीकडे पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे आदेश दिले तर दुसरीकडे भारतीय तपाल यंत्रणांनी दिलेले पुरावे नाकारले आहे. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारताने दिलेले फोन नंबर आणि जैश-ए-मोहम्मदच्या भूमिकेचा पाकिस्तानने इन्कार केला आहे. आता फिंगर प्रिंट्स, आवाजाचे नमुने, दहशतवाद्यांच्या फोटोंची मागणी पाकिस्तान भारताकडे करत आहे.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानला दोन दिवसांची मुदत दिली आहे. पाकिस्तानने दोन दिवसांत कारवाई न केल्यास 15 तारखेला होणारी चर्चा रद्द होऊ शकते.