Breaking News

‘इसिस’कडून एटीएसच्या प्रमुखांना जीवे मारण्याची धमकी


पुणे, 13 -  इसिस या दहशतवादी संघटनेकडून पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख भानुप्रताप बर्गे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 10 जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या एका पत्रात यासंबंधीचा उल्लेख आहे.
 या पत्रात इसिसने भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. सध्या हे पत्र पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून विशेष शाखेकडून या पत्राची तपासणी सुरू आहे आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या शिवाजी नगर भागात असणार्‍या एटीएस कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तरूणांना इसिसमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी सध्या एटीएसकडून पुण्यात विविध ठिकाणी समुपदेशनाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.