मुख्यमंत्र्यांना बैलगाडी हाकण्याचा मोह आवरता आला नाही
जळगाव/प्रतिनिधी। 12 - डॉ.आप्पासाहेब पुरस्कार वितरण सोहळ्याच्यानिमित्ताने जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिकाधिक वेळ जैन हिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी व शेततज्ज्ञांशी चर्चेत घालविला. शेताच्या मातीत पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद विसरून आपल्या मूळ कास्तकाराच्या भूमिकेत शिरले.
बैलजोडीच्या साहाय्याने चालणार्या या पेरणी यंत्राचा कासरा हाती घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
कृषी संशोधन केंद्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्या पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी
उच्च-तंत्र पुरस्कार सोहळ्यासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावी मुक्कामी राहिले. रविवारी
अधिकाधिक वेळ त्यांनी जैन हिल्स येथील संशोधन केंद्रात घालविला. संत्रा व लिंबूवर्गीय पिकांमध्ये प्रक्रिया योग्य असलेल्या स्वीट लेमन अर्थात मोसंबीच्या संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन सर्व माहिती घेतली. जैन
इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी त्यांना माहिती दिली.