महाआरोग्य शिबिरात हजारोंच्या शस्त्रक्रिया
जळगाव/प्रतिनिधी। 12 - खानदेश सेंट्रल मॉल येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिरांतर्गत विविध आजारांवरील एकूण 2 हजार 947 रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर, जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू असलेल्या तपासणीत 2 हजार 500 जणांची तपासणी देखील झाली. खानदेश सेंट्रल मॉल येथे महाआरोग्य शिबिर भरविण्यात आले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून 9 ते 12 जानेवारी दरम्यान शिबिर घेण्याचे निश्चित झाले आहे. शनिवारी (ता.9) शिबिराचा पहिला असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हजारोंच्या संख्येने रूग्णांची तपासणी करण्यासाठी उपस्थिती होती. साधारण दिवसभरात 60 हजाराच्या रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. यातील शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महाआरोग्य शिबिरात तपासणीसाठी येणार्या रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय, गणपती
हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल व गोदावरी हॉस्पिटल या चार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल
रूग्णांवर आजपासून शस्त्रक्रियेला सुरवात करण्यात आली. यामध्ये आज वेगवेगळ्या आजारांवरील 2 हजार 947 रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी ओपीडी सुरू ठेवण्यात आलेली होती. यात सुमारे अडीच हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली.