Breaking News

कला आणि सर्व धर्मांचा मला अभिमान आहे : झाकीर हुसेन

पुणे, 29 - भारतीय परंपरा, कला आणि सर्व धर्मांचा मला अभिमान आहे. मी मुस्लिम आहे, हिंदू आहे, ख्रिश्‍चन आहे, बौद्ध आहे.. पण सर्वांत आधी मी भारतीय आहे,“ असे ठाम वक्तव्य उस्ताद झाकीर हुसेन यांनी शुक्रवार केले. 
माईर्स एमआयटीतर्फे आयोजित सहाव्या छात्र संसदेमध्ये आज झाकीर हुसेन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशातील असहिष्णुतेच्या मुद्यावर अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर झाकीर हुसेन म्हणाले, मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. सर्व धर्मांमधील संदेश
मानवतेसाठीच आहेत. पण हे विसरून दरी निर्माण केली जाते. देशातील तरुण हेच आजचा-उद्याचा भारत आहेत.