मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर महिलेचा शाईहल्ला
नवी दिल्ली, 17 - छत्रसाल स्टेडिअम येथे घेतलेल्या रॅलीत एका महिलेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील ऑड- इव्हन फॉर्म्युल्या संदर्भात एक रॅली घेत असताना हा प्रकार घडला.
भावना असे या महिलेचे नाव असून ती ’आम आदमी सेना’च्या पंजाब गटाची कार्यकर्ता आहे. ’आम आदमी सेना’ हा तोच गट आहे ज्यांनी केजरीवाल ’हुकुमशाही’ पद्धतीने वागतात असा आरोप करत ’आम आदमी पक्षा’चा त्याग केला होता.
