Breaking News

जलालाबाद आत्मघातकी स्फोटात 13 जण मृत्युमुखी


जलालाबाद, 17 - जलालाबाद येथे आज झालेल्या आत्मघातकी स्फोटात 13 जण मृत्युमुखी पडले असून 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. हा स्फोट ननगरहर या भागातील प्रॉविन्शियल काउंसिलचे मेंबर ओबेदुल्लाह शिनवारी यांच्या घरावर झाला. 
 स्थानिक अधिकार्‍यांनुसार, आत्मघातकी हल्लेखोराने काउंसिल मेंबरच्या घरात घुसून स्वतःला उडवले.  ओबेदुल्लाह शिनवारी यांच्या घरात जेव्हा स्फोट झाला तेव्हा तेथे जल्लोष सुरू होता.  शिनवारी यांच्या भावाच्या सुटकेबद्दल हा जल्लोष होता.  शिनवारी यांचा भाऊ तालिबानच्या 9 महिन्याच्या तुरूंगवासातून सुटून घरी परतला होता. या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांमध्ये शिनवारी यांच्या वडीलांचा समावेश आहे. जलालाबाद येथे चार दिवसांपूर्वीच आत्मघातकी हल्ल्याकरून पाकिस्तान कॉन्सलेट यांच्यावर निशाणा साधण्यात आला.  दोन पोलिस कर्मचार्‍यांसमवेत अफगाणी फोर्सच्या सात सैनिकांचा यात मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयएसआयएसने घेतली होती.  यापूर्वी 3 जानेवारीला भारतीय दुतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता.  या हल्ल्याचा हेतू अफजल गुरूच्या मृत्यूचा बदला घेणे हा होता. 
 चार दहशतवादी ठार होण्यापूर्वी दुतावासाच्या भिंतींवर रक्ताने घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.  एका घोषणेत लिहिले होते. ’अफजल गुरुचा बदला’ तर दुसरी घोषणा होती. ’एक शहीद आणि हजार फिदायीन’ 25 तास चाललेल्या या एन्काऊंटरनंतर सर्व चार दहशतवादी ठार करण्यात आले.