Breaking News

पालकमंत्र्यांची गाडी अडविण्याचे आंदोलन स्थगित ः घुले


 अहमदनगर । प्रतिनिधी । 22 -  अ.नगर जिल्हा रिक्षा पंचायतीच्या वतीने शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांबाबत येत्या 26 जानेवारी रोजी पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे यांची गाडी अडविण्याचे आंदोलन करण्यात येणार होते. 
मात्र पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी या परवानाधारक रिक्षा चालकांच्या प्रश्‍नात स्वत: लक्ष घालुन परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांच्या बरोबर लवकरच बैठक घेणार असल्याने त्या बैठकीमध्येच रिक्षाचालकांच्या विविध प्रश्‍न मार्गी लागतील त्यामुळे रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी 26 रोजी होणारे आंदोलन हे स्थगित करत असल्याचे जाहिर केले. तसेच सर्व बॅच व लायसनधारक रिक्षाचालकांना नव्याने परमिट ताबडतोब देण्यात यावे अशी मागणी घुले यांनी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. 
यावेळी पालकमंत्री प्रा.ना.शिंदे म्हणाले कि, रिक्षा पंचायतीच्या विविध मागण्यांबाबत बैठक मुंबई येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत घेणार असुन त्यामध्ये बरेच काही प्रश्‍न मार्गी लागतील असे ते म्हणाले. रिक्षा पंचायतीच्या वतीने शहरातील परवानाधारक रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांच्याबाबत पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या बरोबर पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. यावेळी कॉ.बाबा आरगडे, उपाध्यक्ष सय्यद आजीम, देशमुख, अशोक औशिकर, अक्रम भाई, तपकीरे, लतीफ भाई आदी उपस्थित होते. तरी शहरातील सर्व बॅच व लायसन धारक रिक्षाचालकांनी परमिट मिळविण्यासाठी जिल्हा रिक्षा पंचायतीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन उपाध्यक्ष सय्यद आजीम यांनी केले आहे.