सावकारांनी कर्जवसुलीसाठी एका शेतकर्याला विष पाजले
बीड, 21 - मानेवाडीत दोन सावकारांनी कर्जवसुलीसाठी एका शेतकर्याला विष पाजल्याची घटना घडली आहे. शेतकर्याची प्रकृती गंभीर असून सावकारांना अटक केली आहे.
या शेतकर्याकडे एकूण दहा एकर जमीन होती. मुलीच्या लग्नासाठी पाचंग्री येथील सावकार अप्पा मुंडेकडून एक लाखांचे कर्ज घेतले होते. तारण म्हणून मानेने तीन एकर जमीन दिली होती. दरम्यान पाच वर्षात एक लाखांच्या रकमेचे तब्बल आठ लाख व्याज मानेंनी फेडले. मात्र तरीही सावकाराने कुटुंबाची संपूर्ण जमीन हडप केली. मात्र यावरच हे सावकार थांबले नाही. आप्पा मुंडे आणि त्याच्या सहकार्याने भरत माने यांना 14 जानेवारीला दुपारी साडे तीन वाजता विष पाजल्याचा आरोप मानेंचा मुलगा प्रवीणने केला आहे. दरम्यान या प्रकरणी अप्पा मुंडे आणि सूर्यभान मुंडे या दोन्ही सावकारांवर नेकनूर पोलिस स्टेशनमध्ये सावकारी नियंत्रण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
