Breaking News

वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

लातूर, 21 -  दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काहीच पिकले नाही आणि त्यात वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसेवाघोली येथील 18 वर्षीय तरुणीने गळ
फास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
लग्नासाठी स्थळे येत होती. मात्र प्रत्येकाकडून 4 ते 5 लाखांच्या हुंड्याची विचारणा केली जायची. वडील पांडुरंग भिसे हे पिग्मी एजंट. जेमतेम 1 एकर शेती. त्यात दुष्काळामुळे दोन्ही हंगामात पेरून काहीच उगवले नाही.  मुलीचे लग्न करायचे म्हणून भिसे कुटुंबाने शेती विकण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही चर्चा मोहिनीने ऐकली. आपल्या लग्नासाठी आई-वडिलांची ही घालमेल पाहवली नाही आणि तीने गळफास लावून स्वताचे जीवन संपवले. आपल्या वडिलांची जमीन आणि पैसे आपल्या मृत्यूमुळे वाचतील, मृत्युनंतर कसल्याही धार्मिक विधीत पैसे खर्च करू नयेत तसेच हुंडा प्रथा ही बंद झाली पाहिजे, अशी अपेक्षाही मोहिनीने मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली.