Breaking News

थंडीने महाराष्ट्राला हुडहुडी


मुंबई, 21 -  उत्तरेकडून येणार्‍या गार वार्‍याने महाराष्ट्र अक्षरशः गारठला आहे. विशेषतः नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा पारा कमालीचा खालावला आहे. नाशिक, निफाडमध्ये 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे तीन दिवसांपूर्वी नाशिकचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या वर होता. मात्र अवघ्या तीन दिवसांत पारा तब्बल 4 अंश खाली आला आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी खालावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय धुळ्यातही पारा घसरला आहे.  दुसरीकडे मुंबई-पुण्यातही आज थंडीचा जोर कायम आहे.