Breaking News

शहिद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकास मंजूरी : आ. भोसले


सातारा, 11 - मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांनी अतुलनीय शौर्य दाखवून केडंबे गावासह तालुका, जिल्ह्याची कीर्ती वाढवली. अशा महान वीराच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. प्रशासनाने सर्व शासकीय सोपस्कार पार पाडून ओंबळे यांच्या स्मारकाची तातडीने उभारणी करावी अशी सूचना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. हुतात्मा ओंबळे स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या दालनात आ. शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जावळीचे तहसीलदार रणजित देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश कर्वे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पाटील, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, केळघरचे मंडलाधिकारी पाटील उपस्थित होते. या स्मारकासाठी केडंबे येथे नदीकाठी एक हेक्टर जागा उपलब्ध असून दोन कोटींचा निधी मंजूर आहे.