Breaking News

पल्सपोलिओचे पहिले सत्र 17 जानेवारी रोजी


परभणी, 11 - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 17 जानेवारी व 21 फेब्रूवारी 2016 रोजी राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्हयात ग्रामीण, शहरी व महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.पल्स पोलिओ लसीकरण मोहिम -2016 संदर्भात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डा जावेद अथर, डा कल्पना सावंत, डा काझी, डॉ मुजीब तसेच संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-2016 अंतर्गत जिल्ह्यातील 
एकही लाभार्थी बालक या लसीवाचून वंचित राहू नये यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. या पार्श्‍वभूमीवर सर्व संबंधितांनी आपापल्या मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी दिले. नियमित लसीकरण कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष लसीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेल्या सूक्ष्म कृती आराखडयाचा विचार करुन स्थलांतरीत/भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.