चटई क्षेत्र निर्देशांकाच्या खेळात चंद्रकांत पाटील यांची दिशाभुल
मुंबई/प्रतिनिधी । 13 - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी साबांच्या क्षेत्रीय अभियंत्यांनी पाठविलेला क्लीन चीट अहवाल, त्यावरुन झालेला शिमगा आणि आज सुरु असलेले कवित्व सोबत नाशिकच्या पत्रकारांशी बोलतांना छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया हा योगायोग नाही तर विद्यमान साबांमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या बदनामीसाठी आखण्यात आलेला पध्दतशीर कट असल्याची चर्चा साबां वर्तुळात सुरु आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत असतांनाच अंजली दमानिया आणि भाजपचे खा. किरीट सोम्मैय्या यांनी लोकमंथनच्या संबंधित वृत्ताच्या कात्रणांसह सबळ पुरावे एसीबीकडे सादर केले. त्यांची शहानिशा करुन एसीबीने गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली. चौकशीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांनाच मुंबई साबां प्रादेशिक विभागाच्या वरिष्ठ क्षेत्रीय अभियंत्यांनी नेमक्या वेळेला भुजबळांचे निर्दोषत्व सिध्द करु पाहणारा अहवाल एसीबीला सादर केला. या अहवालात भुजबळांचे कर्तृत्व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्रीमंडळाच्या पायाभूत समितीच्या नावावर नोंदविण्याची सफाई या क्षेत्रीय अभियंत्यांनी केली. हा सारा प्रकार विद्यमान साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांना अंधारात ठेवुन केला गेला. आणि त्यानंतर या क्लीनचीट अहवालाने झालेला सारा गोंधळ सर्वश्रुत आहेच. या गोंधळानतर साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहवाल दुरुस्ती करुन स्वाक्षरीच्या जोडपत्रासह पुन्हा सादर केला. याच जोडपत्राच्या आधारे चंद्रकांत पाटील यांना या अहवाल प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न भुजबळधार्जिणे क्षेत्रीय अभियंत्यांसह स्वत: भुजबळही करीत असल्याचे दिसत आहे. वास्तविक या क्लीनचीट अहवालास मुख्य अभियंता उल्हास देवडवार, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण आणि अधिक्षक अभियंता आर.आर. हांडे
हेच क्षेत्रीय अभियंते जबाबदार आहेत. या क्षेत्रीय अभियंत्यांचे छगन भुजबळ यांच्याशी असलेले पुर्वाश्रमीचे लागेबांधे लक्षात घेऊनच हा अहवाल तयार करण्यात आला. ही बाब आता स्पष्ट झाली आहे. या अहवालाची क्षेत्रीय पातळीवर शहानिशा होऊन तो पुढे वरिष्ठांना सादर होणे अपेक्षित असतांना हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. क्षेत्रीय अभियंत्यांनी चटई क्षेत्र निर्देशांकाचा अभ्यास करुन अहवाल तयार करणे गरजेचे होते. तथापि, मुळ प्रक्रियेत हेच क्षेत्रीय अभियंता सहभागी आहेत. चटई क्षेत्र निर्देशांकाचा सारा घोळ या मंडळींना अवगत आहे. याचाच अर्थ भुजबळांची असलेली मर्जी कायम राखत चंद्रकांत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठीच दिशाभुल करीत हा सारा बनाव केल्याची चर्चा साबांत सुरु आ
हे.