Breaking News

पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

पणजी, 19 -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर आयसीस लिहले आहे.
गोवा पोलिसांनी हे पत्र मिळाल्यानंतर सगळ्या पोलीस स्थानकांमध्ये त्याची माहिती पाठवली असून एटीएसकडे हे पत्र सोपवले आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे की मागच्या आठवड्यात राज्य सचिवालयात हे पत्र आले होते. त्यानंतर गोवा पोलीस सतर्क झाली. हे पत्र कोणी पाठवले आणि कुठून आले याबाबतची चौकशी राज्यात सुरू आहे. गोहत्या बंदी केल्यामुळे आयसीसने या पत्रामध्ये नाराजी वर्तवली आहे, असे पोलीस अधिकार्‍याने सांगितले.