Breaking News

प्रियांका चोप्राचे निर्माती क्षेत्रात पदार्पण

क्वांटिको या अमेरिकन टीव्ही मालिकेतील अभिनयामुळे बॉलीवूड ब्युटी प्रियांका चोप्रा हिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. यानंतर प्रियांका आता नव्या भूमिकेत रमली आहे. तिने ङ्गइट्स माय सिटीफ या मोबी-सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. नेक्सजीटीव्ही या व्हिडीओ एन्टरटेन्मेंट मोबाइल अ‍ॅपने यासाठी पुढाकार घेतला असून, प्रियांका याची सहनिर्माती आहे. खुद्द प्रियांकानेच ट्विटरद्वारे या नव्या प्रोजेक्टबाबत माहिती दिली. मुंबईत जीवनाशी झुंजणार्‍या 4 मुलींची ही कथा आहे. 14 भागांची ही मालिका आठवड्यातून दोनदा प्रसारित होणार आहे.