Breaking News

मोदीलाटेमुळेच निवडून आलो : परेश रावल

अहमदाबाद, 28 - अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळताना त्यांची तुलना थेट प्रभू रामचंद्रांशी केली आहे. ज्याप्रकारे प्रभूरामांच्या नावाचे दगड पाण्यावर तरंगले होते, त्याप्रमाणे मोदी लाटेत आम्ही निवडून आलो, असे रावल म्हणाले. 
परेश रावल हे अहमदाबाद पूर्वच्या जागेवरुन भाजप खासदार आहेत. ‘माझ्या जागी इतर कोणीही 2014 मधील लोकसभा निवडणुकीत उभे असते तर तोही निवडून आला असता’ असे धक्कादायक विधान परेश रावल यांनी केले आहे. अहमदाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रावल यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता आहे. चित्रपट पुरस्कार हे लॉबिंग केल्यावरच मिळतात, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.