Breaking News

शनिशिंगणापूर चौथर्‍यावरील प्रवेशाआधी प्रथेचा विचार करा - शंकराचार्य

मुंबई, 28 - शनिशिंगणापूर चौथर्‍यावरील महिला प्रवेशासबाबत शंकराचार्यांनी विरोधी सूर आवळला आहे. महिलांना सामाजिक न्याय मिळाला, मात्र हा धर्माचा विषय असल्याने त्यांनी प्रथा-परंपरेचा विचार करावा, असे शंकराचार्य यांनी म्हटले आहे.
शिवाय शनी बोलवण्याचा नाही तर दूर करण्याचा देव आहे, यावरही महिलांनी गांभिर्याने चिंतन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र याआधी आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, श्री श्री रविशंकर यांच्यासहित अनेक साधू आणि नेत्यांनी महिला प्रवेशास पाठिंबा दिला आहे. शनीच्या चौथर्‍यावर महिला गेल्यास मूर्तीतून येणार्‍या नकारात्मक ऊर्जांनी विपरित परिणाम होतो. त्यामुळे त्याठिकाणी महिलांना प्रवेश मिळत नाही, 
असे बोलले जाते. दरम्यान, काल भूमाता ब्रिगेडने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.