उखळी येथील शेतकर्याची आत्महत्या
गंगाखेड, दि.12 - तालुक्यातील उखळी (खुर्द) येथील एका तरुण शेतकर्याने सततची नापिकी व सावकारी
कर्जबाजारीपणास कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उखळी (खु.) येथील आज दि. 11 जानेवारी रोजी
सकाळी 7 वा. तरुण मयत शेतकरी तथा रोजगार हमी योजनेतील सेवक प्रल्हाद श्रीराम फड (34 वर्ष) हा दि.
10 रोजी सकाळी झोपेतुन उठुन शेतात गेला घरी परत न आल्याने घर मंडळींनी शोध घेतला असता शेतातील
बाभळीच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. ज्यास सावकारी कर्ज व बँकेचे कर्ज तसेच गेल्या 3
वर्षापासुन शेतात सततची नापिकी होत असुन कर्ज कसे फेडावे या चिंतेने त्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यास आई-वडील, एक भाऊ व पत्न्ी असा परिवार असुन त्यांच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.