Breaking News

बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्राने उठवली



मुंबई, 8 - ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय असलेली बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने अखेर आज उठवली आहे. त्यामुळे आता गावागावात पुन्हा एकदा सर्जा-राजाच्या शर्यतींचा धुराळा उडणार आहे.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी यसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य करीत बैलगाडी शर्यतीवरील बंदी आज उठविली.
‘शेतकरी बैलांची काळजी घेतात. त्यांना प्रेमाने सांभाळतात. शर्यतीसाठी धावणा-या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते. तरीही शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याची अत्यंत तक्रार केली जात होती. त्याच्या आधारावर यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. मात्र, या बंदीमुळे शेतक-यांमध्ये नाराजी होती. बंदी उठवावी म्हणून काही ठिकाणी शेतक-यांनी आंदोलने केली होती.