Breaking News

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड


परभणी, 8 - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या विभागीय अध्यक्षांची निवड करण्यासाठी परभणी येथील बैठकीत महाराष्ट्र प्रांतिकचे उपाध्यक्ष जे.यु. मिटकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकिसाठी नांदेड, हिंगोली, जालना व परभणी जिल्ह्यातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील दहा वर्षातील समाज कार्याचा निकष लक्षात घेवुन एकमताने डॉ. रावसाहेब सखारामराव राऊत यांची महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ. रावसाहेब राऊत यांनी त्यांचे जिल्हाध्यक्षपदाचे काळात प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जेष्ठांचे सत्कार, महिलांसाठी हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप कार्यक्रम, वधु-वर व पालक परिचय मेळावे आणि गरजु समाज बांधवांसाठी विनामुल्य सामुदाईक विवाह आयोजीत केले. संताजी गृह निर्माण संस्थेव्दारे प्लॉटचे वाटप केलेले आहे. पुढील समाज कार्यासाठी सहकार्य आणि सदिच्छा देवुन समाज बांधवांनी अभिनंदन केले.