Breaking News

पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा, 20 -  इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचे आज प्रक्षेपण पार पडले. आज सकाळी 9 वाजून 31 मिनिटांनी स्वदेशी मिनी जीपीएस प्रणालीतील IRNSS-1E दिशादर्शक उपग्रहाचे अवकाशात उड्डाण पार पडले. 
IRNSS-1E हा उपग्रह PSLV - सी ३१ या अत्यंत भरवशाच्या रॉकेटच्या सहाय्याने कक्षेत सोडले गेले. श्रीहरीकोटा इथून हे प्रक्षेपण पार पडले. सध्या आपण वापरत असलेली ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टिम, म्हणजेच GPS प्रणाली परदेशी आहे. मात्र इस्रोने स्वतःची प्रणाली विकसित केली. सात उपग्रहांच्या क्लस्टरद्वारे ही प्रणाली काम करेल. याचा फायदा संरक्षण दल, आपत्कालीन व्यवस्थापन, वैज्ञानिक प्रयोग तसेच वाहतूक व्यवस्थापन, पुरातत्व विभाग, इथे याचा फायदा होईल. क्लस्टरमधले उर्वरित दोन उपग्रह फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाशात पाठवले जातील. आजच्या मोहीमेच्या यशानंतर PSLV या प्रक्षेपकाचे हे सलग 31 वे यशस्वी उड्डाण आहे.