Breaking News

आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली, 20 - उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलने रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केली. 
मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांच्या निशानावर राजधानी दिल्ली - एनसीआर यांशिवाय हरिद्वारमध्ये भरणारे अर्धकुंभही होते. मुख्य आरोपीचे नाव अखलाख असल्याचे म्हटले जाते. 
हरिद्वारमध्ये होणार्‍या अर्धकुंभ दरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. या दहशतवाद्यांचा पठानकोट दहशतवादी हल्ल्याशीही संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी हरियाणाच्या मेवातमधून एक संशयित दहशतवादी अब्दुल शमी याला अटक करण्यात आली होती. हा दहशतवादी झारखंडच्या जमशेदपूरचा राहणारा आहे. हरियाणात शमी याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती या चार दहशतवाद्यांचे धागेदोरे लागले.