गणेशखिंड येथील पिक जीप अडवून चाकूचा धाक दाखवून लुटणारे चार आरोपी गजाआड
जुन्नर (प्रतिनिधी), 12 - जुन्नर शहरापासून जवळ असणारे गणेशखिंडीत पिकअप जीप अडवून चाकूचा धाक दाखवून प्रवाश्यांना लुटणार्या चार आरोपींना जुन्नरपोलिस स्टापने सर्व मालासह अटक केलेली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री देसाई यांनी सांगितली. सविस्तर माहिती अशी की 15 डिसेंबर 2015 बेबी खंडू पानसरे या गणेशखिंडी मार्गे पिकजीपने जुन्नरला येत होत्या.
त्यांना ओमिनी व्हॅनमधून आलेल्या आरोपींनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून 3 तोळयाचे दागिने, मोबाईल व रोखरक्कम घेवून तेथून पळ काढला होता. या घटनेबाबत जुन्नर पोलिसांनी ओतूर पोलिसांना बिनतारी संदेशाव्दारे माहिती दिली होती. सहाय्यक पोलिस ओतूर टी.वाय. मुजावर यांनी नाकाबंदी करून आरोपीची ओमीनी मोटार मोनिका चौकात अडवली होती.
या आरोपींनी पोलिसांना हुलकावणी देवून आळेफाटा या दिशेने धुम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून खामुंडी गावाजवळ आरोपींना पकडले. आरोपी प्रशांत लांडे रा. लांडेवाडी ता.आंबेगाव याला पोलिसांचा हिसका दाखवताच गुन्हा कबूल केला, मात्र इतर चार आरोपींना रस्त्यांत सोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तेव्हापासून त्या चार आरोपींच्या शोधात पोलिस होते, त्या चार आरोपींना पकडण्यात यश आले आहे. आरोपी आमीर बाळासाहेब शेवाळे रा. लांडेवाडी ता. आंबेगाव, संदेश दत्तात्रय थोरात रा.मंचर ता. आंबेगाव, मंगेश ज्ञानेश्वर हांडे रा. मंचर ता. आंबेगाव, बाळासाहेब बापू दाते रा.कासारे ता. पारनेर या आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली.
उपविागीय अधिकारी जयश्री देसाई, पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल देवीदास खेडक, आदिनाथ लोखंडे, अविनाश लोहोटे, राजेंद्र मुंढे, बाळासाहेब हरळ व पथकाच्या सहायाने आरोपींवर कारवाई करुन अटक केली आहे.