Breaking News

संघाच्या लोकांना लाज कशी वाटत नाही ? - राबडी देवी

पाटणा, 18 -   भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी घणाघाती टीका केली आहे. 
’भाजपवाले आम्हाला लाठी में तेल पिलावन पार्टी म्हणतात. पण त्यांना संघाच्या हाफ चड्ड्या कशा काय चालतात?’ असा सवाल त्यांनी केला. आमचे कार्यकर्ते सभेला लाठी घेऊन आले की भाजपवाले भडकतात. पण संघाच्या शिबीरांना लोक लाठ्या घेऊन जातात ते भाजपला कसे काय चालते? संघाचे म्हातारे लोक सार्वजनिक ठिकाणी हाफ चड्ड्या घालून वावरतात, त्यांना लाज कशी वाटत नाही?, अशी जहरी टीका त्यांनी केली.