बीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये 80 टक्के कपात
नवी दिल्ली, 18 - बीएसएनएलने कॉल दरांमध्ये तब्बल 80 टक्के कपात केली आहे. नवे दर 16 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत.
बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे. बीएसएनएलच्या कॉल दरांमध्ये प्रति मिनिट आणि प्रति सेकंद या दोन्ही बिलिंग प्लॅनसाठी कॉल दरांत कपात केली.
बीएसएनएलने याआधी केवळ नव्या प्री-पेड मोबाईल ग्राहकांसाठी कॉल दरांत 80 टक्के कपात केली होती. मात्र, आता या योजनेचा विस्तार करत सर्व प्री-पेड ग्राहकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
