घरफोडी करुन 320 तोळे सोन्यासह 87 लाखांची लूट
पालघर, 18 - पालघर जिल्ह्यातील अजय दांडेकर यांच्या घरी घरफोडी करुन चोरट्यांनी तब्बल 320 तोळे सोने आणि 7 लाख रुपये रोख रक्कम अशी एकूण 87 लाख रुपयांची लूट केली आहे.
मच्छीमार सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या अजय दांडेकर यांच्या ‘जयश्री’ बंगल्यात 9 जानेवारी रोजी ही चोरी घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
